कराड तालुका प्राथमिक शिक्षक संघ कार्यकारिणीच्या कोषाध्यक्षपदी सागर लोहार यांची निवड

कराड तालुका प्राथमिक शिक्षक

संघ कार्यकारिणीच्या 

कोषाध्यक्षपदी 

सागर लोहार यांची निवड

कराड | प्रतिनिधी

अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ, कराड तालुका कार्यकारिणीच्या कोषाध्यक्षपदी पंचवदन विश्वकर्मा सामाजिक संस्थेचे सल्लागार श्री. सागर राजाराम लोहार (बेलवडे हवेली) यांची निवड झाली. त्यांच्या या निवडीबद्दल पंचवदन विश्वकर्मा सामाजिक संस्था, उंब्रज व सर्व उपशाखा तसेच सातारा जिल्हा लोहार सुतार समाज कोअर कमिटीच्या वतीने त्यांचे अभिनंदन करून पुढील सामाजिक व शैक्षणिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.

सागर लोहार हे सामाजिक कार्यात सक्रिय असून, पंचवदन विश्वकर्मा सामाजिक संस्थेच्या माध्यमातून समाजातील विविध प्रश्नांवर तसेच सामाजिक उपक्रमांमध्ये ते सातत्याने योगदान देत आहेत. शिक्षक संघटनेच्या कार्यकारिणीत कोषाध्यक्षपदाची जबाबदारी मिळाल्याने त्यांच्या कार्याचा गौरव झाला असून, या माध्यमातून शिक्षकांच्या विविध प्रश्नांसाठी आणि शैक्षणिक क्षेत्राच्या विकासासाठी ते प्रभावीपणे योगदान देतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. 

त्यांच्या निवडीबद्दल पंचवदन विश्वकर्मा सामाजिक संस्था, उंब्रज व सर्व उपशाखा आणि सातारा जिल्हा लोहार सुतार समाज कोअर कमिटीच्या पदाधिकारी व सदस्यांनी अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments