उरमोडी धरणात युवक बुडाला; छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले रेस्क्यू टीमकडून शोधमोहीम


उरमोडी धरणात युवक बुडाला

छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले रेस्क्यू टीमकडून शोधमोहीम

सातारा | प्रतिनिधी

सातारा तालुक्यातील उरमोडी धरण परिसरात मित्रांसोबत फिरण्यासाठी गेलेला एक युवक पाण्यात बुडाल्याची घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली. सदर युवकाचा शोध घेण्यासाठी पाण्यात शोधमोहीम राबविण्यात आली. मात्र, पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे बचाव कार्याला अडथळे निर्माण झाल्याने रात्री सातच्या सुमारास शोधमोहीम थांबविण्यात आली.

रेस्क्यू टीमने सांगितले की, उद्या सकाळी साडेपाच वाजता पुन्हा शोधमोहीम सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी बोट तसेच आवश्यक रेस्क्यू साहित्य तयारी करून ठेवण्यात आली आहे. टीममधील सदस्यांना सकाळच्या मोहिमेसाठी सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

संबंधित युवक हा सातारा शहरातील फुटका तलाव परिसरातील चकोर बेकरीमध्ये काम करणारा कामगार असल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आले. तो दुपारच्या सुमारास मित्रांसोबत उरमोडी धरण परिसरात फिरण्यासाठी गेला होता. याचवेळी तो पाण्यात बुडाल्याची माहिती समोर आली. अद्याप त्याचे नाव व माहिती समजू शकते नाही.

Post a Comment

0 Comments