‘भंडारे इन्फ्रा एल.एल.पी.’च्या
नवीन कार्यालयाचे उद्घाटन
संतोष शिराळे, सातारा | प्रतिनिधी
सातारा येथील लँडमार्क टॉवर येथे श्री. ओंकार भंडारे यांच्या ‘भंडारे इन्फ्रा एल.एल.पी.’ या संस्थेच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंत्री भोसले यांनी ओंकार भंडारे व त्यांच्या सहकाऱ्यांना नवीन कार्यालयाच्या माध्यमातून व्यवसायाची पुढील यशस्वी वाटचाल करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
उद्घाटनप्रसंगी सातारा जिल्हा परिषदेचे सदस्य कामेश कांबळे, अजित साळुंखे, सातारा नगरीचे नगराध्यक्ष अमोल मोहिते, बांधकाम सभापती बाळासाहेब खंदारे, आरोग्य सभापती धनंजय जांभळे, नगरसेवक अविनाश कदम, सीमा भोसले, वनिता शिंदे, फिरोज पठाण, अक्षय जाधव, रवी पवार, विश्वतेज बालगुडे यांच्यासह विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
नवीन कार्यालयाच्या माध्यमातून ‘भंडारे इन्फ्रा एल.एल.पी.’च्या कामकाजाला अधिक व्यापक स्वरूप मिळणार असून, बांधकाम व पायाभूत सुविधा क्षेत्रात दर्जेदार काम करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला. मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या या उद्घाटन सोहळ्यामुळे भंडारे इन्फ्रा एल.एल.पी.च्या नव्या पर्वाला सुरुवात झाली.




0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!