आदर्की खुर्द येथे
रानडुकराची शिकार
चार आरोपींना वनविभागाने केली अटक
आरोपींना एक दिवसाची वनकोठडी
फलटण | प्रतिनिधी
फलटण वनपरिक्षेत्रातील मौजे आदर्की खुर्द येथे रानडुकराची शिकार केल्याप्रकरणी वनविभागाने चार जणांविरुद्ध वन्यजीव संरक्षण कायद्यान्वये कारवाई करत त्यांना अटक केली आहे. न्यायालयाने सर्व आरोपींना एक दिवसांची वनकोठडी सुनावली आहे.
वनपरिक्षेत्र फलटण अंतर्गत आदर्की खुर्द येथे ३० जुलै २०२६ रोजी रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास रानडुकराची बेकायदेशीर शिकार होत असल्याची गोपनीय माहिती वनविभागाला मिळाली. त्यानुसार वनरक्षकांनी तात्काळ छापा टाकून चार आरोपींना रंगेहाथ ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये सोमनाथ बाबू भेळकर (वय ५०), अमोल रघुनाथ जाधव (वय ३०), विक्रम संतोष ढवळे (वय २५) आणि गणेश लक्ष्मण जाधव (वय २५) या सर्वांचा समावेश असून ते आदर्की खुर्द (ता. फलटण, जि. सातारा) येथील रहिवासी आहेत.
या प्रकरणी वन्यजीव संरक्षण अधिनियम, १९७२ मधील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना ३१ जुलै रोजी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने एक दिवसांची वनकोठडी सुनावली.
कारवाईदरम्यान आरोपींकडून रानडुकराचे मांस, एक टीव्हीएस मोटारसायकल (क्रमांक MH11 BU 4585) आणि मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत.
वनविभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, वन्यप्राण्यांची शिकार, अवैध वाहतूक, वनक्षेत्रात अतिक्रमण किंवा इतर वनगुन्ह्यांची माहिती मिळाल्यास तत्काळ वनविभागाशी संपर्क साधावा. अशा गुन्ह्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही विभागाने दिला आहे.
ही कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी निकिता बोटेकर, सहाय्यक वनसंरक्षक आणि वनकर्मचाऱ्यांच्या पथकाने केली असून, पुढील तपास सुरू आहे.

0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!