ओझरे येथे मुसळधार पावसात रस्त्यालगत पलटी झालेली चार चाकी कार

ओझरे येथे 

चारचाकी वाहन पलटी

जीवितहानी टळली; सुदैवाने प्रवासी सुखरूप

मेढा | प्रतिनिधी

सातारा जिल्ह्यातील ओझरे परिसरात शनिवारी मुसळधार पावसादरम्यान एक फोर व्हीलर गाडी रस्त्यालगत पलटी झाल्याची घटना घडली. या अपघातात गाडीचे नुकसान झाले असले, तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसून सर्व प्रवासी सुखरूप बचावले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पावसामुळे रस्ता निसरडा झाल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि गाडी रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाली. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. त्यानंतर वाहनातील सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले.

या अपघातात कोणालाही गंभीर दुखापत झाली नसल्याने मोठा अनर्थ टळला. पावसामुळे रस्ते निसरडे झाले असल्याने वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण ठेवून सावधगिरीने वाहन चालवावे, असे आवाहन स्थानिकांकडून करण्यात येत आहे.