'Top Gear Jaoli Jodi Run' ची विक्रमाकडे दमदार वाटचाल; २२ नोव्हेंबरला जावळीत इतिहास घडणार; Asia Book व India Book of Records मध्ये होणार नोंद; ३० ऑगस्टपर्यंत नोंदणीचे आवाहन

'Top Gear Jaoli Jodi Run' ची 

विक्रमाकडे दमदार वाटचाल

२२ नोव्हेंबरला जावळीत इतिहास घडणार

Asia Book व India Book of Records मध्ये होणार नोंद

३० ऑगस्टपर्यंत नोंदणीचे आवाहन

मेढा | प्रतिनिधी

येत्या २२ नोव्हेंबर २०२६ रोजी जावळीच्या ऐतिहासिक भूमीत आयोजित करण्यात येणाऱ्या 'Top Gear Jaoli Jodi Run' या आगळ्यावेगळ्या स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली असून, यंदा या स्पर्धेची सातवी आवृत्ती पार पडणार आहे. विशेष म्हणजे, या स्पर्धेची Asia Book of Records आणि India Book of Records मध्ये विक्रमी नोंद होणार असल्याने महाराष्ट्रासह देशभरातील धावपटूंमध्ये या स्पर्धेबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

स्पर्धेसाठी ३० ऑगस्ट २०२६ ही नोंदणीची अंतिम मुदत निश्चित करण्यात आली असून, पती-पत्नी, भाऊ-बहिण, मित्र-मैत्रीण, आई-वडील व मुले अशा कोणत्याही जोडीने या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. मोठ्या संख्येने नोंदणी करून या ऐतिहासिक उपक्रमाचा भाग बनण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

'Top Gear Jaoli Jodi Run' ही केवळ धावण्याची स्पर्धा नसून नातेसंबंधातील विश्वास, समन्वय, एकोपा आणि आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश देणारा सामाजिक उपक्रम आहे. जगातील एकमेव अशा संकल्पनेवर आधारित या स्पर्धेमुळे जावळीचे नाव राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचणार असल्याचा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.

संस्थापक-अध्यक्ष नवनाथ डिगे म्हणाले, "'Top Gear Jaoli Jodi Run' ही जगातील एकमेव जोडी रन म्हणून स्वतंत्र ओळख निर्माण करत आहे. Asia Book of Records आणि India Book of Records मध्ये नोंद होणे हा संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण असेल. सर्व धावपटूंनी ३० ऑगस्टपूर्वी नोंदणी करून या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हावे."

यावेळी डायरेक्टर डॉ. सुधीर पवार, सचिव संजय धनवडे, खजिनदार सुहास पाटील यांच्यासह आयोजक टीम उपस्थित होती.

Post a Comment

0 Comments