दुपारी ४ वाजेपर्यंत 'रेड अलर्ट'! सातारासह तीन जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा; नागरिकांनी सतर्क राहावे

दुपारी ४ वाजेपर्यंत

'रेड अलर्ट'!

सातारासह तीन जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा

नागरिकांनी सतर्क राहावे

संतोष शिराळे सातारा | 

हवामान विभागाने दुपारी १.०० ते ४.०० वाजेपर्यंतच्या नाऊकास्ट अंदाजात राज्यातील काही जिल्ह्यांसाठी अतिमहत्त्वाचा इशारा जारी केला आहे. सातारा, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला असून, पुढील तीन तासांत काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस, विजांचा कडकडाट आणि जोरदार वारे वाहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

याशिवाय पालघर, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, पुणे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या भागांत मुसळधार ते जोरदार पावसाची शक्यता असून नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

विशेषतः सातारा जिल्ह्यात आधीच अनेक भागांत जोरदार पाऊस सुरू असल्याने नदी-नाले, ओढे आणि धबधबे धोकादायक बनू शकतात. सखल भागात पाणी साचणे, घाटमाथ्यावर दरडी कोसळणे आणि वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

नागरिकांसाठी आवाहन :

अनावश्यक प्रवास टाळावा.

नदी, ओढे आणि धबधब्यांच्या परिसरात जाणे टाळावे.

वीज कडकडत असताना सुरक्षित ठिकाणी थांबावे.

स्थानिक प्रशासन आणि हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे.

नाऊकास्ट वैधता : दुपारी १.०० ते ४.०० वाजेपर्यंत.

परिस्थितीनुसार पुढील इशारे जारी होऊ शकतात.

Post a Comment

0 Comments