नवनियुक्त पोलीस उपअधीक्षक विपुल पाटील यांनी घेतली खासदार उदयनराजे भोसले यांची सदिच्छा भेट

नवनियुक्त पोलीस उपअधीक्षक

विपुल पाटील यांनी घेतली

खा. उदयनराजे भोसले 

यांची सदिच्छा भेट

संतोष शिराळे, सातारा :

सातारा विभागाचे नवनियुक्त पोलीस उपअधीक्षक श्री. विपुल पाटील यांनी आज जलमंदिर पॅलेस येथे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांची सदिच्छा भेट घेतली.

या भेटीदरम्यान सातारा जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था, नागरिकांची सुरक्षितता, गुन्हे प्रतिबंधक उपाययोजना आणि जनहिताशी संबंधित विविध विषयांवर सकारात्मक चर्चा झाली. जिल्ह्यात शांतता व सुरक्षित वातावरण कायम राखण्यासाठी पोलीस प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यात समन्वय राहण्याबाबतही यावेळी विचारविनिमय झाला.

खासदार उदयनराजे भोसले यांनी नवनियुक्त पोलीस उपअधीक्षक श्री. विपुल पाटील यांचे स्वागत करत त्यांना नव्या जबाबदारीसाठी शुभेच्छा दिल्या. सातारा जिल्ह्यात प्रभावी, संवेदनशील आणि लोकाभिमुख पोलीस प्रशासन उभारण्यात त्यांना यश लाभो, अशा सदिच्छाही त्यांनी व्यक्त केल्या.

Post a Comment

0 Comments