साताऱ्यात बंद पत्र्याच्या घरात सिलिंडरचा भीषण स्फोट; सुदैवाने जीवितहानी टळली

साताऱ्यात बंद पत्र्याच्या घरात

सिलिंडरचा भीषण स्फोट

सुदैवाने जीवितहानी टळली

संतोष शिराळे, सातारा : 

सातारा शहरातील मंगळवार पेठ परिसरातील पावर हाऊसजवळील संत कबीर सोसायटी येथे बंद असलेल्या पत्र्याच्या घरात गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. स्फोटाचा आवाज दूरपर्यंत ऐकू गेल्याने नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.

प्राथमिक माहितीनुसार, यवतेश्वरकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पावर हाऊसजवळील घर बंद असताना हा स्फोट झाला. स्फोटामुळे घराचे मोठे नुकसान झाले असून परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र, घर बंद असल्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी अथवा दुखापत झाली नाही. 

घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली असून स्फोटाचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये काही काळ घबराट पसरली होती.

Post a Comment

0 Comments