भाजप महिला मोर्चाची सातारा
जिल्हा कार्यकारिणी जाहीर
जिल्हाध्यक्षा तेजस्विनी घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली विविध पदांवर महिलांना संधी
संतोष शिराळे | सातारा
भारतीय जनता पक्षाच्या सातारा जिल्हा महिला मोर्चाची वर्ष २०२६-२७ ची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्षा सौ. तेजस्विनी घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली ही कार्यकारिणी घोषित करण्यात आली असून, जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील महिलांना संघटनात्मक जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत.
या कार्यकारिणीत ९ सरचिटणीस, ४६ उपाध्यक्ष, ४३ चिटणीस, दोन सोशल मीडिया संयोजक, एक कोषाध्यक्ष तसेच प्रत्येक तालुक्यातून तीन मंडल अध्यक्ष प्रतिनिधींची निवड करण्यात आली आहे. या निवडी भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले.
भाजपचे सातारा जिल्हाध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांच्या कराड दक्षिण मतदारसंघातील महिला मोर्चाची कार्यकारिणी अद्याप जाहीर होणे बाकी असल्याची माहिती देण्यात आली.
दरम्यान, नव्या कार्यकारिणीत विविध समाजघटकांतील महिलांना प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे पक्षाचे म्हणणे आहे. ग्रामीण भागातील महिलांचे संघटन बळकट करून त्यांना विकासकामांमध्ये सक्रिय भूमिका बजावण्याची संधी देण्याचा उद्देश असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.




0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!