नीरा नदीत पुलावरून
पडलेल्या वारकऱ्याला
NDRF कडून जीवदान
संतोष शिराळे | लोणंद/सातारा
आषाढी वारी पालखी सोहळ्यादरम्यान आज सकाळी नीरा नदीवरील पुलावरून एक वारकरी अपघाताने नदीत पडल्याची घटना घडली. NDRF च्या सतर्क जवानांनी तातडीने बचावकार्य करत संबंधित वारकऱ्याचा जीव वाचवला.
मिळालेल्या माहितीनुसार, गणेश शंकर भिसे (वय 42) हे पुलावरून नदीत पडून जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच 5L D/05 बटालियन NDRF चे निरीक्षक दिलीप कुमार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने त्वरित घटनास्थळी धाव घेतली. जवानांनी नदीत उतरून सुरक्षितरीत्या जखमी वारकऱ्याला बाहेर काढले. त्यानंतर प्राथमिक मदत देऊन जखमी वारकऱ्याला पुढील उपचारासाठी नागरी प्रशासनाच्या वैद्यकीय पथकाच्या ताब्यात देण्यात आले. NDRF च्या जवानांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे संभाव्य अनर्थ टळला असून त्यांच्या जलद आणि वेळेवर केलेल्या कारवाईचे भाविकांकडून कौतुक करण्यात येत आहे.

0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!