लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या ५७ व्या पुण्यतिथीनिमित्त सातारा नगरपरिषदेकडून अभिवादन; नगराध्यक्ष अमोल मोहिते यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण; सामाजिक समता व परिवर्तनाच्या विचारांचा जागर

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे

यांच्या ५७ व्या पुण्यतिथीनिमित्त

सातारा पालिकेकडून अभिवादन

नगराध्यक्ष अमोल मोहिते यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण

सामाजिक समता व परिवर्तनाच्या विचारांचा जागर

सातारा | प्रतिनिधी

लोकशाही रणांगणातील लढवय्ये, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या ५७ व्या पुण्यतिथीनिमित्त सातारा नगरपरिषदेच्या वतीने त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. याचवेळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या पुतळ्यांनाही पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.

या प्रसंगी सातारा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष अमोल मोहिते, उपनगराध्यक्ष ॲड. डी. जी. बनकर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए)चे जिल्हाध्यक्ष अशोक बापू गायकवाड, नगरपालिका आर्थिक दुर्बल घटक सभापती संकेत साठे, नगरसेविका सावित्री बडेकर, अर्चना कांबळे तसेच सचिन कांबळे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी साहित्य, शाहिरी आणि सामाजिक चळवळीच्या माध्यमातून शोषित, वंचित आणि कष्टकरी समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी उभारलेला संघर्ष आजही प्रेरणादायी असल्याचे सांगितले. सामाजिक समता, बंधुता आणि परिवर्तनाची त्यांनी दिलेली शिकवण समाजासाठी दिशादर्शक असून त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

या अभिवादन कार्यक्रमास नगरपरिषदेचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments