हुमगाव हायस्कूलसमोर विटांनी भरलेला टेम्पो पलटी; सुदैवाने जीवितहानी टळली

हुमगाव हायस्कूलसमोर

विटांनी भरलेला टेम्पो पलटी

सुदैवाने जीवितहानी टळली

मेढा | प्रतिनिधी

जावळी तालुक्यातील हुमगाव हायस्कूलसमोर आज विटांनी भरलेला एक टेम्पो अचानक पलटी झाल्याची घटना घडली. या अपघातात टेम्पोतील विटा रस्त्यावर विखुरल्या गेल्याने काही काळ वाहतुकीला अडथळा निर्माण झाला.

अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. रस्त्यावर पडलेल्या विटा बाजूला करण्याचे काम नागरिकांच्या मदतीने करण्यात आले. प्राथमिक माहितीनुसार या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून चालक किरकोळ जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. मात्र, याबाबत अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. 

Post a Comment

0 Comments