कण्हेर धरणातील पाणी गढूळ; नागरिकांनी पाणी गाळून व उकळूनच वापरावे – महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे आवाहन

 


कण्हेर धरणातील पाणी गढूळ

नागरिकांनी पाणी गाळून व उकळूनच वापरावे

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे आवाहन

सातारा | प्रतिनिधी 

शाहूपुरी (कण्हेर धरण उद्भव) नळपाणी पुरवठा योजनेतील सर्व ग्राहकांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या  वतीने महत्त्वाचे आवाहन केले आहे. मागील चार ते पाच दिवसांतील मुसळधार पावसामुळे कण्हेर धरणात मोठ्या प्रमाणात गाळमिश्रित व गढूळ पाण्याची आवक झाली आहे.

प्राधिकरणाकडून या पाण्यावर आवश्यक ती शुद्धीकरण प्रक्रिया करण्यात येत असली, तरी खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी नळाद्वारे येणारे पाणी गाळून व उकळूनच पिण्यासाठी वापरावे, असे आवाहन करण्यात आले आहे. 

सुरक्षित पिण्याच्या पाण्याच्या दृष्टीने नागरिकांनी आवश्यक दक्षता घ्यावी आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणास सहकार्य करावे, असेही प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे.

Post a Comment

0 Comments