सातारा जिल्ह्यात पावसाची संततधार
कोयना धरणातील पाणीसाठ्यात वाढ
महाबळेश्वरात 70 मिमी पाऊस
सातारा, प्रतिनिधी |
सातारा जिल्ह्यात गुरुवारी दिवसभर ढगाळ वातावरणासह रिमझिम ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू होता. महाबळेश्वर परिसरात दिवसभर दाट धुके पसरले होते. सकाळपासून अधूनमधून रिमझिम व मध्यम सरी कोसळत राहिल्याने थंड वातावरणाची अनुभूती नागरिकांनी घेतली.
महाबळेश्वर येथे गुरुवारी 77 मिमी पावसाची नोंद झाली. कमाल तापमान 19.7 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 17.0 अंश सेल्सिअस राहिले. दिवसभर हवेतील आर्द्रता 100 टक्के होती. सायंकाळीही दाट धुके, अधूनमधून मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि काही वेळा वाऱ्याचा वेग वाढल्याचे चित्र पाहायला मिळाले.
सातारा शहरातही दिवसभर ढगाळ वातावरण कायम राहिले. किमान तापमान 21.5 अंश सेल्सिअस, तर कमाल तापमान 26.5 अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. मागील 24 तासांत 4.5 मिमी, तर सकाळी 8.30 ते सायंकाळी 5.30 या कालावधीत 3.2 मिमी पावसाची नोंद झाली.
दरम्यान, कोयना धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत असून, सायंकाळी 5 वाजेपर्यंत धरणाची पाणीपातळी 2043.08 फूट (622.910 मीटर) इतकी झाली आहे. धरणात 15.47 टीएमसी (14.70%) एकूण, तर 10.35 टीएमसी (10.33%) उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे.
कोयना धरण क्षेत्रात आज 17 मिमी, नवजा येथे 41 मिमी, तर महाबळेश्वर येथे 70 मिमी पावसाची नोंद झाली. धरणात 5,516 क्युसेक पाण्याची आवक सुरू असून, सध्या धरणातून कोणताही विसर्ग करण्यात आलेला नाही.


0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!