हरवलेले ६.१५ लाखांचे २५ मोबाईल शोधून नागरिकांना परत

हरवलेले ६.१५ लाखांचे २५ 

मोबाईल शोधून नागरिकांना परत

वाठार स्टेशन पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी

सातारा : वाठार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागरिकांचे हरवलेले तब्बल ६ लाख १५ हजार रुपये किमतीचे २५ मोबाईल फोन शोधून संबंधितांना परत देण्यात वाठार पोलिसांना यश आले आहे. या उल्लेखनीय कामगिरीमुळे नागरिकांकडून पोलिसांचे कौतुक होत आहे.

पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर आणि सातारा ग्रामीण विभागाच्या उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री तेरणी यांच्या मार्गदर्शनाखाली वाठार पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशिल भोसले यांनी गुन्हे प्रकटीकरण (डी.बी.) पथकाला हरवलेल्या मोबाईलचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या होत्या.

त्याअनुषंगाने डी.बी. पथक आणि सातारा सायबर पोलीस ठाण्याने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे महाराष्ट्रासह इतर राज्यांतील मोबाईल धारकांशी वारंवार संपर्क साधत विशेष मोहीम राबविली. या चिकाटीच्या प्रयत्नांमुळे ६.१५ लाख रुपये किमतीचे २५ मोबाईल हस्तगत करण्यात आले असून, ते संबंधित नागरिकांना परत देण्याची कार्यवाहीही पूर्ण करण्यात आली आहे. यापुढेही अशा प्रकारची मोहीम सातत्याने राबविण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशिल भोसले यांनी दिली.

ही कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री तेरणी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशिल भोसले, पोलीस उपनिरीक्षक गहिणीनाथ सातव, नितीन भोसले, पोलीस हवालदार तानाजी चव्हाण, उदय जाधव, जितेंद्र शिंदे, प्रकाश चव्हाण तसेच पोलीस कॉन्स्टेबल विठ्ठल काळे, प्रथमेश अलगुडे, प्रशांत गोरे, प्रतीक देशमुख, आशा देशमुख आणि सातारा सायबर पोलीस ठाण्याच्या पथकाने पार पाडली.

Post a Comment

0 Comments