विलासपूर जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप, संग्राम बर्गे व मित्र परिवाराचा सामाजिक उपक्रम; विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद

विलासपूर जिल्हा परिषद

शाळेत विद्यार्थ्यांना

शालेय साहित्याचे वाटप

संग्राम बर्गे व मित्र परिवाराचा सामाजिक उपक्रम

विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद

सातारा | प्रतिनिधी

सामाजिक बांधिलकी जपत दरवर्षीप्रमाणे यंदाही विलासपूर गोळीबार मैदान येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना संग्राम बर्गे व मित्र परिवाराच्या वतीने शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साहित्य देऊन त्यांच्या शैक्षणिक वाटचालीला प्रोत्साहन देण्यात आले.

शालेय साहित्य मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकला. शिक्षणाबरोबरच समाजाप्रती असलेली जबाबदारी लक्षात घेऊन राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, पालक तसेच ग्रामस्थांनी कौतुक केले.

यावेळी निर्मल पवार, आबा शिंदे, दीपक सुतार, महेश चौगुले, विजय पवार, निलेश पाटील, गणेश नलवडे, यश सूर्यवंशी, बरकत बेग, कौस्तुभ शिंदे तसेच मित्रपरिवारातील सदस्य उपस्थित होते.

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला हातभार लागावा आणि गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साहित्य मिळावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. भविष्यातही अशा सामाजिक उपक्रमांचे सातत्य राखण्याचा निर्धार संग्राम बर्गे व मित्र परिवाराने व्यक्त केला.



Post a Comment

0 Comments