दक्षिण सुदानमधील
मराठा लाइट इन्फंट्रीच्या
जवानांशी खासदार
उदयनराजेंचा व्हिडिओ संवाद
जलमंदिर पॅलेसमधील जनता दरबारात नागरिकांच्या समस्यांचाही घेतला आढावा
संतोष शिराळे, सातारा |
संयुक्त राष्ट्रसंघाच्या (UN) शांतता मोहिमेत दक्षिण सुदान येथे कार्यरत असलेल्या मराठा लाइट इन्फंट्रीच्या जवानांशी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी शनिवारी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधत त्यांच्या सेवाकार्याची माहिती घेतली. यावेळी त्यांनी जवानांच्या शौर्य, कर्तव्यनिष्ठा आणि राष्ट्रसेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
हजारो किलोमीटर दूर राहून जागतिक शांततेसाठी योगदान देणाऱ्या भारतीय जवानांमुळे देशाचा तिरंगा जागतिक स्तरावर अभिमानाने फडकत असल्याचे सांगत, प्रत्येक भारतीयाला त्यांच्या कार्याचा अभिमान असल्याचे उदयनराजे भोसले यांनी नमूद केले. देशाच्या सन्मानासाठी आणि जागतिक शांततेसाठी जवान देत असलेल्या योगदानाचे त्यांनी कौतुक केले. यानंतर जलमंदिर पॅलेस येथे आयोजित जनता दरबारात उदयनराजे यांनी नागरिकांच्या विविध समस्या, तक्रारी, सूचना आणि निवेदने ऐकून घेतली. अनेक प्रश्नांची तातडीने दखल घेत संबंधित विभागातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
काही प्रश्नांवर जागेवरच निर्णय घेण्याचा प्रयत्न करण्यात आला, तर उर्वरित प्रकरणांचा निश्चित कालमर्यादेत पाठपुरावा करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना देण्यात आले. लोकप्रतिनिधी म्हणून जनतेशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी सोडविणे आणि प्रशासनाशी समन्वय साधून न्याय मिळवून देणे हेच आपल्या कार्याचे प्रमुख ध्येय असल्याचे उदयनराजे यांनी यावेळी स्पष्ट केले.
जनतेचा विश्वास हीच आपली सर्वात मोठी ताकद असून, प्रत्येक नागरिकाच्या सेवेसाठी तसेच राष्ट्रहितासाठी आपण सदैव तत्पर, संवेदनशील आणि कटिबद्ध राहू, असा निर्धार खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केला.


0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!