सातारा जिल्ह्यात
मान्सूनचा जोर वाढला
रात्री ११ वाजेपर्यंत दमदार हजेरी
पाटणमधील पाथरपुंज येथे १७४ मिमी सर्वाधिक पाऊस
कोयना धरण परिसरात ९३ मिमी पाऊस
महाबळेश्वरमध्ये ११७ मिमी पाऊस
संतोष शिराळे, सातारा |
महाराष्ट्रात मान्सूनचे वारे सक्रिय झाल्याने पुढील आठवडाभर राज्यात पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्याचा परिणाम सातारा जिल्ह्यात दिसून येत असून मंगळवारी जिल्ह्यात अनेक भागांत दमदार पाऊस झाला. सातारा येथील हवामान केंद्रात कमाल तापमान २६.६ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. हवेतील आर्द्रता ९३ टक्के होती. सकाळी ८.३० ते सायंकाळी ५.३० या कालावधीत १७.१ मिमी पावसाची नोंद झाली. दिवसभर ढगाळ वातावरणासह जोरदार वाऱ्यांसह पावसाच्या सरी कोसळत होत्या.
दरम्यान, महाबळेश्वरमध्ये पावसाचा जोर अधिक कायम असून तेथे कमाल तापमान १९.४ अंश सेल्सिअस नोंदले गेले. शंभर टक्के आर्द्रतेसह ५३.४ मिमी पाऊस झाला. दाट धुक्यामुळे परिसर पूर्णपणे झाकोळून गेला होता.
कोयना धरण परिसरातही पावसाची चांगली हजेरी लागली. मंगळवार (दि. २३ जून) सायंकाळी ५ वाजेपर्यंत कोयना धरणाची पाण्याची पातळी २०३८ फूट ११ इंच (६२१.४६२ मीटर) इतकी झाली आहे. धरणात एकूण १३.८१ टीएमसी (१३.१२ टक्के) तर उपयुक्त पाणीसाठा ८.६९ टीएमसी (८.६७ टक्के) इतका उपलब्ध आहे.
गेल्या २४ तासांत कोयना येथे ९३ मिमी, नवजा येथे १०७ मिमी, पाथरपुंज १७४ मिमी तर महाबळेश्वर येथे ११७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. हंगामातील एकूण पर्जन्यमान अनुक्रमे ९६ मिमी, १३९ मिमी आणि ८० मिमी इतके झाले आहे.सध्या कोयना धरणात नवीन पाण्याची आवक सुरू झालेली नसून कोयना जलविद्युत प्रकल्पामार्फत ५२५ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नदीपात्रात कोणताही अतिरिक्त विसर्ग करण्यात आलेला नाही.


0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!