साताऱ्यात महायुतीची वज्रमूठ
धैर्यशील कदम यांच्या विजयासाठी जिल्हाभर बैठका
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींचा निर्धार
संतोष शिराळे, सातारा प्रतिनिधी : सातारा-सांगली स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे अधिकृत उमेदवार धैर्यशील ज्ञानदेव कदम यांच्या प्रचारार्थ सातारा, कराड आणि खटाव येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकींना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करून धैर्यशील कदम यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला.
कराड, सातारा, जावळी, वाई, खंडाळा, महाबळेश्वर, कोरेगाव, खटाव, माण (म्हसवड) आदी तालुक्यांतील नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सभापती तसेच महायुतीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने या बैठकींना उपस्थित होते. आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने संघटनात्मक बांधणी, प्रचाराचे नियोजन, मतदारांशी संपर्क, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींमधील समन्वय आणि विजयाची रणनीती यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
या बैठकींना खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे, आमदार डॉ. अतुल भोसले, आमदार मनोज घोरपडे, आमदार महेश शिंदे, माजी आमदार डॉ. दिलीपराव येळगावकर, माजी आमदार आनंदराव पाटील, माजी आमदार मदनदादा भोसले, माजी आमदार सदाभाऊ सपकाळ, सत्यजितदादा पाटणकर जिल्हा परिषद अध्यक्षा प्रियाताई शिंदे, भरत नाना पाटील, सुनील काटकर, अरुण गोरे, काका धुमाळ, बंडा गोडसे, जितेंद्र पवार, रणधीर जाधव, अर्चना किरण बर्गे, नीता बाळासाहेब खरात, किरण बर्गे, जयवंत पवार, कृषी आणि पशुसंवर्धन सभापती लता कर्णे, कामेश कांबळे, निलेश नलावडे, विठ्ठल बालशेटवार, ॲड. विनीत विलास पाटील यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी व पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकांमध्ये उपस्थित मान्यवरांनी महायुतीची ताकद, कार्यकर्त्यांचा उत्साह आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील व्यापक पाठिंबा लक्षात घेता धैर्यशील कदम यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास व्यक्त केला. तसेच प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचून महायुतीच्या उमेदवाराला विक्रमी मताधिक्य मिळवून देण्यासाठी संघटितपणे काम करण्याचे आवाहन करण्यात आले.
गुरुवार, दि. १८ जून २०२६ रोजी होणाऱ्या मतदानात सातारा-सांगली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था प्रतिनिधींनी महायुतीचे अधिकृत उमेदवार धैर्यशील ज्ञानदेव कदम यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला. जिल्हाभर सुरू असलेल्या बैठका आणि कार्यकर्त्यांचा वाढता उत्साह पाहता महायुतीच्या विजयाचा विश्वास नेत्यांनी व्यक्त केला.





0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!