राजा माने व मंदा माने कृत ‘जय हो’ मालिकेत ‘मानसी प्रेरणा’च्या संचालिका मुग्धा भागवत यांची मुलाखत

राजा माने व मंदा माने कृत

‘जय हो’ मालिकेत

‘मानसी प्रेरणा’च्या संचालिका

मुग्धा भागवत यांची मुलाखत

सह्याद्री वाहिनीवर १८ जून रोजी रात्री ८ वाजता, तर १९ जून रोजी दुपारी २ वाजता पुनःप्रसारण

मुंबई : राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या संकल्पनेतून उभी राहिलेली आणि "जीवनाला पंख नवे, पंखांना नाते नवे" हे ब्रीद समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचविणाऱ्या कोथरूड येथील ‘मानसी प्रेरणा’ संस्थेच्या संचालिका मुग्धा भागवत यांची विशेष मुलाखत ‘जय हो’ या लोकप्रिय मालिकेतून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

दूरदर्शन प्रस्तुत आणि राजा माने व मंदा माने निर्मित ‘जय हो’ मालिकेत समिरा गुजर आणि राजा माने यांनी मुग्धा भागवत यांच्याशी संवाद साधला आहे. कोथरूडमधील विविध वस्त्यांमध्ये महिला सक्षमीकरण आणि सामाजिक बांधिलकीचे कार्य करणाऱ्या ‘मानसी प्रेरणा’ संस्थेच्या उपक्रमांवर या मुलाखतीत प्रकाश टाकण्यात आला आहे.

ही विशेष मुलाखत गुरुवार, १८ जून रोजी रात्री ८ वाजता आणि शुक्रवार, १९ जून रोजी दुपारी २ वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रसारित होणार आहे. समाजाभिमुख कार्य करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा गौरव करणाऱ्या ‘जय हो’ मालिकेतून मुग्धा भागवत यांच्या कार्याचा प्रेरणादायी प्रवास प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.

Post a Comment

0 Comments