विकास देशमुख यांना 'लोकराजा राजर्षी शाहू महाराज गौरव पुरस्कार प्रदान

विकास देशमुख यांना 

लोकराजा राजर्षी शाहू महाराज

गौरव पुरस्कार प्रदान

आरोग्यसेवेतील लोकाभिमुख कार्याचा राज्यस्तरीय सन्मान

कोल्हापूर | प्रतिनिधी

शासकीय आरोग्य योजनांची प्रभावी, पारदर्शक आणि लोकाभिमुख अंमलबजावणी करून देशभरातील लाखो आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना मोफत व गुणवत्तापूर्ण उपचार उपलब्ध करून देणारे आरोग्यसेवा व्यवस्थापन क्षेत्रातील दूरदृष्टीचे नेतृत्व श्री. विकास ज्ञानू देशमुख यांना 'राज्यस्तरीय लोकराजा राजर्षी शाहू महाराज गौरव पुरस्कार – २०२६' या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने रविवारी कोल्हापूर येथे सन्मानित करण्यात आले. आरोग्यसेवा क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्याची ही राज्यस्तरीय दखल मानली जात आहे.

कोल्हापूरच्या ऐतिहासिक राजर्षी शाहू स्मारक भवन येथे झालेल्या भव्य सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. समाजहितासाठी उल्लेखनीय, लोकाभिमुख आणि परिवर्तनशील कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सखोल अभ्यास करून अविष्कार सोशल अँड एज्युकेशनल फाउंडेशन, कोल्हापूर यांच्या वतीने हा पुरस्कार दरवर्षी दिला जातो. यापूर्वी अॅड. उज्ज्वल निकम, उद्योगपती संजय घोडावत यांच्यासह विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. तसेच दुबई व मलेशिया येथेही या पुरस्कार सोहळ्यांचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा आरोग्यसेवा व्यवस्थापन क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय आणि परिणामकारक कार्याची दखल घेत श्री. विकास देशमुख यांची या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

लाखो रुग्णांसाठी वरदान ठरले व्यवस्थापन मॉडेल

"समाजातील शेवटच्या घटकापर्यंत गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा पोहोचली पाहिजे आणि कोणताही रुग्ण आर्थिक अडचणीमुळे उपचारांपासून वंचित राहू नये," या ध्येयाने श्री. विकास देशमुख यांनी अनेक वर्षे सातत्याने कार्य केले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली विकसित करण्यात आलेल्या शासनाच्या आरोग्य योजनांच्या अंमलबजावणीच्या अभिनव व्यवस्थापन मॉडेलमुळे देशभरातील लाखो गरजू रुग्णांना मोफत व दर्जेदार उपचारांचा लाभ मिळाला आहे. कार्यक्षम नियोजन, पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि परिणामकारक अंमलबजावणी यांचा समन्वय साधत त्यांनी आरोग्यसेवा व्यवस्थापनाचा नवा आदर्श निर्माण केला आहे.

सन्मानांची गौरवशाली परंपरा

आरोग्यसेवा क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाची यापूर्वीही विविध स्तरांवर दखल घेण्यात आली आहे. कोविड-१९ महामारीच्या काळातील उल्लेखनीय सेवेसाठी त्यांना महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या हस्ते "कोविड योद्धा पुरस्कार" प्रदान करण्यात आला होता. त्यानंतर त्यांच्या नेतृत्वाखाली विकसित झालेल्या लोकाभिमुख आरोग्यसेवा मॉडेलला 'अर्थसंकेत – महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड' हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाला.

देशभरातील शासकीय आरोग्य योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीतील योगदानाबद्दल गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते त्यांना "राष्ट्रीय गौरव पुरस्कार" बहाल करण्यात आला. तसेच महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच सांगली जिल्ह्यातील दोन हजारांहून अधिक शेतकरी स्वयंस्फूर्तीने एकत्र येत रुग्णसेवेतील योगदानाचा गौरव करण्यासाठी "सेवा यज्ञ जीवन गौरव पुरस्कार – २०२६" प्रदान करण्यात आला. वाळवा येथे झालेला हा सोहळा समाजाने व्यक्त केलेल्या विश्वासाचे प्रतीक ठरला. आता या गौरवशाली सन्मानांच्या शृंखलेत "राज्यस्तरीय लोकराजा राजर्षी शाहू महाराज गौरव पुरस्कार – २०२६" या प्रतिष्ठेच्या पुरस्काराची भर पडली आहे.

शासनाने हे मॉडेल राज्यभर राबवावे

पुरस्कार वितरण सोहळ्यात उपस्थित मान्यवरांनी श्री. विकास देशमुख यांच्या कार्याचे विशेष कौतुक करत शासनाच्या आरोग्य योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी त्यांनी विकसित केलेले व्यवस्थापन मॉडेल अत्यंत पारदर्शक, लोकाभिमुख आणि दूरदर्शी असल्याचे नमूद केले.

राज्य शासनाने अशा संस्थांबरोबर व्यापक स्तरावर काम केल्यास लाखो नागरिकांना अधिक दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध होईल, हजारो युवकांना रोजगाराच्या संधी निर्माण होतील आणि शासनाच्या आरोग्य योजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे करता येईल, असे मतही यावेळी व्यक्त करण्यात आले.

"हा पुरस्कार माझा नाही; समाजाचा आहे"

पुरस्कार स्वीकारल्यानंतर मनोगत व्यक्त करताना श्री. विकास देशमुख म्हणाले, "छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कोल्हापूरच्या भूमीत हा सन्मान स्वीकारताना विशेष प्रेरणा मिळत आहे. हा पुरस्कार माझा नसून लाखो रुग्ण, डॉक्टर, नर्स, अधिष्ठाता, वैद्यकीय अधीक्षक, शासकीय अधिकारी, प्रशासकीय अधिकारी, रुग्णालय व्यवस्थापन, आरोग्य कर्मचारी आणि C. S. Creative Solutions परिवारातील प्रत्येक सहकाऱ्याचा आहे." समाजातील शेवटच्या घटकापर्यंत आरोग्यसेवा पोहोचविण्याचा संकल्प अधिक दृढ करत भविष्यातही अधिक व्यापक स्तरावर कार्य करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

राष्ट्रसेवेच्या संस्कारातून समाजसेवेचा प्रवास

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक तसेच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पूर्णवेळ कार्यकर्ते म्हणून मिळालेल्या राष्ट्रसेवेच्या संस्कारांमुळेच समाजकार्यासाठी आयुष्य समर्पित करण्याची प्रेरणा मिळाल्याचे श्री. देशमुख यांनी सांगितले. रुग्णसेवेतील आपल्या संपूर्ण कार्याचे श्रेय त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतून मिळालेल्या संस्कारांना अर्पण केले.

राजर्षी शाहू महाराजांनी दिलेल्या सामाजिक न्याय, शिक्षण, समान संधी आणि सर्वसामान्यांच्या उन्नतीच्या विचारांचा वारसा पुढे नेत समाजातील शेवटच्या घटकापर्यंत दर्जेदार आरोग्यसेवा पोहोचविण्यासाठी अधिक व्यापक स्तरावर कार्यरत राहण्याचा निर्धारही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Post a Comment

0 Comments