भारती विद्यापीठ हायस्कूलमध्ये
विद्यार्थ्यांना शालेय वह्यांचे वाटप
दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा आदर्श उपक्रम
पाचगणी | प्रतिनिधी
गोडवली (पाचगणी), ता. महाबळेश्वर, जि. सातारा येथील भारती विद्यापीठ हायस्कूल, गोडवली येथे माजी विद्यार्थ्यांच्या पुढाकारातून शालेय वह्यांचे वाटप करण्यात आले. शिक्षणाला प्रोत्साहन देणारा हा उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
स्वरा एन्टरप्रायजेसचे संदीप तुकाराम वाडकर यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय वह्यांचे वितरण करण्यात आले. सकाळी ११ वाजता कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी विद्यार्थिनींनी मान्यवरांचे स्वागत केले. सन २००१–२००२ च्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांपैकी संदीप वाडकर, विकास जंगम, अजित बेलोशे, सुशील गोळे, विकास पवार आणि जितेंद्र मालुसरे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले.
यावेळी माजी विद्यार्थ्यांनी सांगितले की, "ज्या शाळेने आम्हाला शिक्षण, संस्कार आणि आयुष्यात पुढे जाण्याची प्रेरणा दिली, त्या शाळेचे ऋण फेडण्याच्या भावनेतून हा उपक्रम राबविला आहे. शिक्षकांनी दिलेल्या ज्ञान आणि संस्कारांमुळेच आम्ही आज समाजात जबाबदार नागरिक म्हणून उभे आहोत."
यावेळी त्यांनी सावंत सर, आबदार सर, गायकवाड सर, माने सर, आंबवडे सर, गुजरे सर तसेच मुख्याध्यापक कदम सर यांनी दिलेल्या मार्गदर्शनाचे आणि संस्कारांचे कृतज्ञतापूर्वक स्मरण केले. श्री. निलेश सपकाळ, सौ. अडाटे एस. व्ही. मॅडम, सौ. मालुसरे मॅडम तसेच शिपाई साबळे जे. ए. यांचा सत्कार करण्यात आला.
शाळेचे मुख्याध्यापक श्री. सावंत एस. एन. यांनी उपस्थितांचे आभार मानले. माजी विद्यार्थ्यांनी राबविलेल्या सामाजिक, शैक्षणिक उपक्रमाचे शिक्षक, विद्यार्थी व पालकांनी कौतुक केले.


0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!