साताऱ्यात कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या वासराची गोरक्षकांकडून सुटका; मुख्य संशयिताला अटक

साताऱ्यात कत्तलीसाठी

डांबून ठेवलेल्या वासराची

गोरक्षकांकडून सुटका

मुख्य संशयित आरोपीला अटक

संतोष शिराळे, सातारा : 

सातारा शहरात गोवंश कत्तलीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, गोरक्षकांच्या सतर्कतेमुळे एका निष्पाप वासराचा जीव वाचला आहे. कत्तलीच्या उद्देशाने एका वासराला बेकायदेशीररीत्या डांबून ठेवण्यात आल्याची गोपनीय माहिती गोरक्षकांना मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत कारवाई केली.

गोरक्षकांनी छापा टाकत वासराची सुखरूप सुटका केली. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच सातारा शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणी मुख्य संशयित आरोपीला तात्काळ ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.

आरोपीविरुद्ध प्राणी संरक्षणासंदर्भातील लागू कायद्यांनुसार सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

या कारवाईमुळे गोरक्षकांच्या तत्परतेचे नागरिकांकडून कौतुक होत असून, गोवंश कत्तलीसारख्या बेकायदेशीर कृत्यांमध्ये सहभागी असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.

Post a Comment

0 Comments