शिवसेनेच्या ६०व्या
वर्धापन दिनानिमित्त
महाबळेश्वरात विविध उपक्रम
अनेकांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश
महाबळेश्वर : शिवसेनेच्या ६० व्या वर्धापन दिनानिमित्त महाबळेश्वर शहर शिवसेनेच्या वतीने विविध सामाजिक, शैक्षणिक आणि संघटनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करून वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून तसेच फटाक्यांची आतषबाजी करत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी महाबळेश्वर शहरप्रमुख विजयभाऊ नायडू यांनी शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी लावलेल्या शिवसेनेच्या विचारांच्या वृक्षाचे आज वटवृक्षात रूपांतर झाले असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची यशस्वी घोडदौड सुरू असल्याचा अभिमान प्रत्येक शिवसैनिकाला असल्याचे सांगितले.
या प्रसंगी सातारा जिल्हा उपप्रमुख तथा पंचायत समिती सदस्य संजयभाऊ शेलार यांच्या उपस्थितीत दीपक भिलारे, सत्यम फळणे, अमोल फळणे यांच्यासह युवा कार्यकर्ते ऋषिकेश शिंदे आणि साहिल सुतार यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. प्रवेशानंतर परिसर शिवसेनेच्या घोषणांनी दुमदुमून गेला.
वर्धापन दिनानिमित्त शाळा क्रमांक ५, गणेशनगर हाऊसिंग सोसायटी येथे बालचमूंच्या हस्ते केक कापण्यात आला. तसेच बालवाडी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना वह्या व खाऊचे वाटप करण्यात आले. शेठ गंगाधर माखरिया हायस्कूलमधील विद्यार्थ्यांनाही वह्या व खाऊचे वितरण करण्यात आले. याचबरोबर हायस्कूलच्या आवारात शिवसेना शहर शाखेच्या वतीने वृक्षारोपणाचा उपक्रम राबविण्यात आला.
या कार्यक्रमास शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संजयभाऊ शेलार, शहरप्रमुख विजयभाऊ नायडू, ज्येष्ठ शिवसैनिक वसंत फळणे गुरुजी, उपतालुकाप्रमुख संजय कांबळे, उपशहरप्रमुख सचिन गुजर, अल्पसंख्याक शहरप्रमुख उस्मानभाई खरखंडे, वैद्यकीय कक्ष शहरप्रमुख गोविंदभाऊ कदम, तालुका वैद्यकीय कक्ष प्रमुख राजाभाऊ पंडित, देवळी विभागप्रमुख दीपक जाधव, सोशल मीडिया जिल्हाप्रमुख गौरव राक्षे, विभागप्रमुख सचिन वाईकर, शाखाप्रमुख हर्ष साळुंखे, विभागप्रमुख प्रकाश जाधव, शाखाप्रमुख असलम डांगे, किरण मोरे, महाबळेश्वर शहर मीडिया प्रमुख अक्षय सकपाळ, महिला तालुकाप्रमुख मेघाताई चोरगे, वैद्यकीय तालुका प्रमुख वर्षाताई आरडे, महिला शहरप्रमुख सुनीताताई फळणे, माजी उपतालुकाप्रमुख सोनाली बांदल, मंगल फळणे, आशाताई जाधव, अर्चना जाधव, शितल वाईकर, सुरेखा पंडित, सुवर्णा कदम यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, महिला पदाधिकारी, युवा सैनिक व शिवसैनिक उपस्थित होते.



0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!