सांगली-सातारा विधान परिषद
निवडणुकीसाठी दोन वाजेपर्यंत
८१.५६ टक्के मतदान
पाटण, जतमध्ये शंभर टक्के मतदान
संतोष शिराळे सातारा : सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी बुधवारी (ता. १८) मतदान उत्साहात पार पडत असून दुपारी २ वाजेपर्यंत तब्बल ८१.५६ टक्के मतदान झाले आहे. एकूण ८९५ मतदारांपैकी ७३० सदस्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.
सकाळी १० वाजेपर्यंत केवळ ३.०२ टक्के मतदान झाले होते. त्यानंतर मतदानाचा वेग वाढला आणि दुपारी १२ वाजेपर्यंत २९.२७ टक्के मतदानाची नोंद झाली. दुपारी २ वाजेपर्यंत मतदानाने थेट ८१.५६ टक्क्यांचा टप्पा गाठल्याने निवडणुकीत चुरस वाढल्याचे चित्र दिसून आले.
पाटण आणि जत तालुक्यांमध्ये शंभर टक्के मतदान झाले असून, खानापूर-विटा विभागात ९७.९४ टक्के, कोरेगावमध्ये ९२.८६ टक्के, माणमध्ये ९१.३८ टक्के आणि वाईमध्ये ९०.९१ टक्के मतदानाची नोंद झाली आहे.
सातारा तहसील कार्यालयातील मतदान केंद्रावर ८१.५८ टक्के, कराडमध्ये ८३.३३ टक्के, कडेगावमध्ये ८३.३३ टक्के आणि सांगली येथील अपर तहसील कार्यालयात ८६.६२ टक्के मतदान झाले. फलटणमध्ये ३२.२६ टक्के, तर वाळवा-इस्लामपूर येथे २९.२७ टक्के मतदानाची नोंद झाली.
महायुतीचे भाजपचे उमेदवार धैर्यशील कदम आणि महाविकास आघाडीचे उमेदवार अभयसिंह जगताप यांच्यात प्रतिष्ठेची लढत होत असल्याने मतदानाच्या वाढत्या टक्केवारीमुळे दोन्ही गटांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अंतिम मतदानाची आकडेवारी आणि मतमोजणीकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!