ताथवडे येथे ‘डराडो’ संस्थेतर्फे
वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात
फलटण : पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत फलटण तालुक्यातील ताथवडे येथे डसऱ्याक रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (DRADO) संस्थेतर्फे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. कै. ॲड. धोंडीराम अर्जुना खरात (निवृत्त प्राचार्य) यांच्या सहाव्या पुण्यतिथी आणि ७६ व्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात शेकडो वृक्षांचे रोपण तसेच बीजरोपण करण्यात आले.
वन विभागाच्या क्षेत्रामध्ये आयोजित या उपक्रमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. यावेळी विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करून भविष्यात हरित परिसर निर्माण करण्याचा संकल्प करण्यात आला.
या कार्यक्रमाला संस्थेच्या डायरेक्टर ॲड. कांचनकन्होजा धोंडीराम खरात, डॉ. महेशकुमार धोंडीराम खरात, वनरक्षक सुरज इंकर, वनसेवक गजाबा जाधव तसेच संस्थेचे स्वयंसेवक राजाराम अडसूळ, सुखदेव फुले, पंकज शिंदे, सनी नाळे, श्रीकांत गावडे, अशोक गावडे, वीरसेन सोनवणे आणि हिम्मतराव खरात उपस्थित होते.
तसेच ताथवडे गावातील जाधव, शिंदे आणि अन्य ग्रामस्थांनीही या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला. पर्यावरण रक्षणासाठी प्रत्येकाने वृक्ष लागवड करणे आणि त्यांचे संगोपन करणे ही काळाची गरज असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले.

0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!