फलटण तालुक्यातील शिवसेनेच्या पहिल्या युवासेना शाखेचा सुरवडीत शानदार शुभारंभ


फलटण तालुक्यातील

शिवसेनेच्या पहिल्या

युवासेना शाखेचा

सुरवडीत शानदार शुभारंभ 

उद्योगमंत्री उदय सामंत, खासदार राहुल शेवाळे व संजीवराजे नाईक निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती

फलटण : शिवसेनेच्या युवासेनेचा फलटण तालुक्यात झपाट्याने विस्तार होत असून सुरवडी येथे तालुक्यातील पहिल्या युवासेना शाखेचा शानदार शुभारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री ना. उदय सामंत, मा. खासदार राहुल शेवाळे तसेच विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा धुमधडाक्यात संपन्न झाला.

शिवसेनेचे मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक व युवासेना सचिव किरण साळी यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर युवासेनेचे संघटन मजबूत करण्याचे काम सुरू आहे. त्याच धर्तीवर सातारा जिल्ह्यातही युवकांना एकत्र करून संघटन बळकट करण्यासाठी विविध भागांत शाखा स्थापन करण्यात येत आहेत.


फलटण तालुक्यातील सुरवडी येथे सुरू करण्यात आलेली ही पहिली युवासेना शाखा आगामी काळात युवकांसाठी प्रेरणादायी ठरणार असल्याची भावना यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली. तसेच माण, खटाव आणि फलटण या भागांमध्ये युवासेनेच्या पहिल्या दहा शाखांचे उद्घाटन करण्यात येणार असल्याची माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली.

या उपक्रमासाठी उद्योगमंत्री ना. उदय सामंत, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, नगरसेवक श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर, माजी सभापती श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर तसेच माढा लोकसभा युवा सेना संपर्कप्रमुख सुजितभैय्या खुर्द यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.

युवासेना जिल्हा समन्वयक अमित पवार आणि उपजिल्हाप्रमुख प्रतिक रिटे यांच्या नेतृत्वाखाली हा शाखा उद्घाटन सोहळा पार पडला. कार्यक्रमाला जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव, जिल्हा समन्वयक विराज खराडे, तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर पवार, नानासो इवरे, तालुका संघटक विजय मायने, विधानसभा संपर्कप्रमुख सुभाष पवार, अनिल मासाळ, सोलापूर जिल्हा समन्वयक निखिल चांदगुडे तसेच युवासेना, महिला आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments