ज्येष्ठ पत्रकार मधु नेने यांचे हृदयविकाराने निधन

 


ज्येष्ठ पत्रकार मधु नेने यांचे 

हृदयविकाराने निधन

वाई | प्रतिनिधी

वाई अर्बन बँकेचे निवृत्त अधिकारी, ज्येष्ठ पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते व प्रख्यात लेखक मधुसूदन दिनानाथ नेने उर्फ मधु नेने (वय ७४) यांचे गुरुवारी दुपारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाने पत्रकारिता, सहकार, साहित्य व सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

सहकार, बँकिंग आणि संत साहित्याचे गाढे अभ्यासक म्हणून मधु नेने यांची विशेष ओळख होती. विविध वृत्तपत्रे व नियतकालिकांतून त्यांनी सातत्याने अभ्यासपूर्ण लेखन केले. ते ‘सज्जनगड’ मासिकाचे संपादक म्हणून कार्यरत होते. वाई अर्बन बँक, लोकमान्य टिळक ग्रंथ संग्रहालय, वसंत व्याख्यानमाला, प्राज्ञ पाठशाळा, मराठी विश्वकोश तसेच विविध सामाजिक-सांस्कृतिक संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता.

मकरंद पत्रकार प्रतिष्ठान व वाई तालुका मराठी पत्रकार संघाच्या माध्यमातून त्यांनी पत्रकारांना मार्गदर्शन केले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच विविध क्षेत्रातील मान्यवर व नागरिकांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

Post a Comment

0 Comments