जावलीत आदर्श शिक्षक
पुरस्कारांसह गुणवंत
विद्यार्थी व मार्गदर्शक
शिक्षकांचा उद्या गौरव
सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे यांची उपस्थिती
मेढा | प्रतिनिधी
पंचायत समिती जावलीच्या शिक्षण विभागाच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण समारंभ तसेच गुणवंत विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक गुणगौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, दि. १२ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी २ वाजता मेढा येथील कलश मंगल कार्यालयात हा कार्यक्रम होणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले राहणार आहेत. जावली तालुक्यातील शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांचा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मान करण्यात येणार असून, शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांसह त्यांच्या यशासाठी मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचाही यावेळी गौरव करण्यात येणार आहे.
कार्यक्रमास जिल्हा परिषद सातारा अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे, उपाध्यक्ष राजू (भैय्या) भोसले, सदस्य वसंतराव मानकुमरे, शिक्षण सभापती तेजस्विनी कदम, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) धनंजय चोपडे, शिक्षणाधिकारी (योजना) शबनम मुजावर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) अनिस नायकवडी, जिल्हा परिषद सदस्य जयश्री गिरी, कविता ओंबळे, पंचायत समिती जावलीचे सभापती सौरभ (बाबा) शिंदे, उपसभापती गोरख महाडीक, सदस्य चारुशिला पवार, शिल्पा शिंदे, आतिश कदम, तसेच मेढा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा रुपाली वारागडे व उपनगराध्यक्ष विकास देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. याशिवाय शिक्षक बँकेचे संचालक विजय शिर्के, चेअरमन विशाल कणसे, शिक्षक समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर शिर्के, शिक्षक संघाचे अध्यक्ष तानाजी आगुंडे, गटविकास अधिकारी डॉ. निलेश पाटील, गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ, विस्ताराधिकारी चंद्रकांत कर्णे, तसेच विविध केंद्रांचे केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक आणि शिक्षक उपस्थित राहणार आहेत.
जावली तालुक्यातील शिक्षण व्यवस्थेत शिक्षकांचे योगदान, गुणवंत विद्यार्थ्यांची शैक्षणिक कामगिरी आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांची भूमिका अधोरेखित करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शिक्षक दिनाच्या निमित्ताने आयोजित या गौरव सोहळ्यात शिक्षण क्षेत्रातील विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार व सन्मान प्रदान करण्यात येणार आहेत.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पंचायत समिती जावलीच्या शिक्षण विभागाच्या वतीने नियोजन करण्यात आले असून, तालुक्यातील शिक्षक, विद्यार्थी, पालक व शिक्षणप्रेमींनी उपस्थित राहावे, असे आवाहन गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ यांनी केले आहे.

0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!