वीर जवान रोहित पवार यांच्या अंत्ययात्रेत खासदार उदयनराजे भोसले सहभागी; चिंचणीच्या सुपुत्राला अखेरचा निरोप; कुटुंबीयांचे केले सांत्वन

वीर जवान रोहित पवार 

यांच्या अंत्ययात्रेत खासदार

उदयनराजे भोसले सहभागी

चिंचणीच्या सुपुत्राला अखेरचा निरोप; कुटुंबीयांचे केले सांत्वन

सातारा | प्रतिनिधी 

देशसेवेचे पवित्र कर्तव्य बजावताना वीरगती प्राप्त झालेले चिंचणी, ता. सातारा येथील सुपुत्र नाईक रोहित रामचंद्र पवार (114 Armed Engineer) यांच्या अंत्ययात्रेत खासदार उदयनराजे भोसले सहभागी झाले. त्यांनी नाईक रोहित पवार यांच्या पार्थिवाला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन केले.

देशाच्या रक्षणासाठी कर्तव्य बजावत असताना नाईक रोहित पवार यांना वीरमरण आले. त्यांच्या सर्वोच्च बलिदानाने चिंचणी गावासह संपूर्ण सातारा जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. वीर जवानाच्या अंत्ययात्रेला नागरिक, नातेवाईक, विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी खासदार उदयनराजे भोसले यांनी शहीद जवानाच्या कुटुंबीयांशी संवाद साधत त्यांना धीर दिला. देशाच्या संरक्षणासाठी रोहित पवार यांनी केलेला त्याग आणि शौर्य सदैव स्मरणात राहील, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Post a Comment

0 Comments