जावळीत २८ सप्टेंबरला
‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत
विविध योजनांचे शिबिर
मेढा : प्रतिनिधी
शासनाच्या ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत विमुक्त जाती व भटक्या जमाती संवर्गातील नागरिकांना विविध शासकीय कागदपत्रे तसेच शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सोमवार, दि. २८ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता तहसील कार्यालय, जावळी येथे विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक सेवेला २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त राज्यात दि. १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत जावळी तालुक्यातील पात्र लाभार्थ्यांना विविध शासकीय सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
मिळणार विविध कागदपत्रांचा लाभ
शिबिरामध्ये आधारकार्ड, मतदान ओळखपत्र, शिधापत्रिका, जन्म-मृत्यू दाखला, आयुष्मान भारत कार्ड, जात प्रमाणपत्र, उत्पन्न दाखला, नॉन-क्रीमीलेअर प्रमाणपत्र, रहिवास प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, विवाह नोंदणी प्रमाणपत्र, प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र तसेच दिव्यांग प्रमाणपत्र आदी कागदपत्रांसाठी मार्गदर्शन व सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
शासकीय योजनांसाठीही मार्गदर्शन
याशिवाय श्रावणबाळ अर्थसहाय्य योजना, संजय गांधी निराधार योजना, लाडकी बहीण योजना, प्रधानमंत्री आवास योजना, अॅग्रीस्टॅक योजनेंतर्गत फार्मर आयडी, तसेच आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आदींचा लाभ मिळवून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येणार आहे.
विमुक्त जाती व भटक्या जमाती संवर्गातील पात्र नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह दि. २८ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता तहसील कार्यालय, जावळी येथे उपस्थित राहून शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार जावळी प्रविण मुदगुल यांनी केले आहे.

0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!