मंत्री शिवेंद्रसिंहराजेंचा मॉर्फ फोटो व्हायरल! भाजप आक्रमक; भाजप पदाधिकाऱ्यांचे सातारा शहर पोलिसांकडे निवेदन; सोशल मीडिया ॲडमिनवर कारवाईची मागणी


मंत्री शिवेंद्रसिंहराजेंचा

मॉर्फ फोटो व्हायरल!

भाजप आक्रमक; भाजप पदाधिकाऱ्यांचे सातारा शहर पोलिसांकडे निवेदन

सोशल मीडिया ॲडमिनवर कारवाईची मागणी

सातारा | प्रतिनिधी

महाराष्ट्राचे मंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते ना. श्री छ शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा मॉर्फ केलेला व छेडछाड केलेला फोटो सोशल मीडियावर प्रसारित केल्याप्रकरणी संबंधित व्यक्ती, महाविकास आघाडीच्या सोशल मीडिया पेजचे ॲडमिन व अन्य संबंधितांवर तातडीने कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी भाजप पदाधिकाऱ्यांनी सातारा शहर पोलिसांकडे निवेदनाद्वारे केली.

सातारा शहर मध्य मंडल अध्यक्ष अविनाश (राजेंद्र) खर्शीकर यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन पोलिसांना देण्यात आले. सोशल मीडियावरील संबंधित पोस्टमुळे शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची प्रतिमा मलिन करण्याचा तसेच जनमानसात गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
सदर मॉर्फ केलेला फोटो महाविकास आघाडीच्या सोशल मीडिया पेजवरून जाणीवपूर्वक प्रसारित करून सामाजिक वातावरण बिघडविण्याचा व चिथावणी निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याने या प्रकरणाची सायबर विभागामार्फत सखोल चौकशी करावी. संबंधित पोस्ट करणारे, ती प्रसारित करणारे तसेच महाविकास आघाडीचे संबंधित सोशल मीडिया पेजचे ॲडमिन यांच्यावर लागू कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली.

तसेच आक्षेपार्ह पोस्ट तातडीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून हटविण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी आणि महाविकास आघाडीच्या संबंधित सोशल मीडिया अकाउंट/पेजवर कायदेशीर प्रक्रियेनुसार प्रतिबंधात्मक कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली. पोस्टचा स्क्रीनशॉट व सोशल मीडिया पेजची लिंक पोलिसांकडे पुराव्यादाखल साद करण्यात आली.

यावेळी सातारा शहर मध्य मंडल अध्यक्ष अविनाश खर्शीकर, बाह्य मंडल अध्यक्ष वैशाली टंकसाळे, जिल्हा सरचिटणीस विकास गोसावी, नगरसेवक धनंजय भाऊ जांभळे, नगरसेविका रीना भनगे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष हर्षल चिकणे, जिल्हा उपाध्यक्ष विक्रांत भोसले, जिल्हा संवादक प्रवीण शहाणे, अमित भिसे, अमोल टंगसाळे, प्रशांत जाधव, कैलास सुतार, विक्रम बोराटे, विजय नायक, सागर जाधव, निलेश चोरगे, डॉ. संजय कुमार कोरे, डॉ. सचिन साळुंखे, प्रशांत जोशी, वीरसिंह परदेशी, युवराज मोरकर, श्रीकांत वायदंडे, मनोहर वडलिक, नंदा इंगवले, गौरी गुरव, शुभदा महाबळेश्वरकर यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

“सोशल मीडियाचा गैरवापर करून कोणत्याही लोकप्रतिनिधीची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही. पोलिसांनी या प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी,” अशी मागणी यावेळी भाजप पदाधिकाऱ्यांनी केली.

Post a Comment

0 Comments