सातारा हिल हाफ मॅरेथॉनमध्ये दुर्घटना; ६० वर्षीय धावपटूची प्रकृती गंभीर; पल्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू

सातारा हिल हाफ

मॅरेथॉनमध्ये दुर्घटना

६० वर्षीय धावपटूची प्रकृती गंभीर

पल्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू

सातारा | प्रतिनिधी 

आज पार पडलेल्या प्रसिद्ध 'सातारा हिल हाफ मॅरेथॉन' दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेले ज्येष्ठ धावपटू संजय शामराव कदम (वय ६० ते ६४) यांची प्रकृती अचानक खालावल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संजय कदम यांनी मॅरेथॉनचे पूर्ण अंतर यशस्वीरीत्या पार केले होते. मात्र, परतत असताना सातारा नगरपालिकेच्या परिसरात त्यांना अचानक तीव्र दम लागला व ते चक्कर येऊन खाली कोसळले. घटनेचे गांभीर्य ओळखून मॅरेथॉनच्या मेडिकल टीमने तात्काळ रेस्क्यू ऑपरेशन राबवत त्यांना प्राथमिक उपचार देऊन पल्स हॉस्पिटलमध्ये हलवले.

सध्या डॉक्टरांचे पथक त्यांच्यावर उपचार करत असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेमुळे मॅरेथॉन प्रेमींमध्ये आणि नागरिक वर्गात काळजीचे वातावरण पसरले आहे.

Post a Comment

0 Comments