उन्नती व उत्कर्षच्या करहर शाखेचे स्थलांतर; मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा उत्साहात; अल्पावधीत १५ कोटींच्या व्यवसायाचा टप्पा; महाराष्ट्र–गुजरातमध्ये ६४ शाखांचे जाळे

उन्नती व उत्कर्षच्या 

करहर शाखेचे स्थलांतर

मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा उत्साहात

अल्पावधीत १५ कोटींच्या व्यवसायाचा टप्पा

महाराष्ट्र–गुजरातमध्ये ६४ शाखांचे जाळे

कुडाळ | प्रतिनिधी

महाराष्ट्र व गुजरात या दोन राज्यांत ६४ शाखांचे विस्तृत जाळे असलेल्या उन्नती व उत्कर्ष आर्थिक परिवाराच्या करहर शाखेच्या स्थलांतराचा उद्घाटन सोहळा नुकताच उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. उन्नती व उत्कर्ष आर्थिक परिवाराचे संस्थापक मा. श्री. हनुमंत रांजणे यांच्या हस्ते नव्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले.

करहर परिसरातील ग्राहक, ठेवीदार, उद्योजक आणि नागरिकांना अधिक सुलभ व प्रभावी आर्थिक सेवा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने शाखेचे स्थलांतर करण्यात आले आहे. आर्थिक व्यवहारांमध्ये विश्वास, ग्राहकसेवा आणि स्थानिक पातळीवरील आर्थिक गरजा यांना प्राधान्य देत उन्नती व उत्कर्ष परिवाराने अल्पावधीत आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली असल्याचे यावेळी मान्यवरांनी नमूद केले.

उन्नती व उत्कर्ष परिवाराने अल्प कालावधीत १५ कोटी रुपयांच्या व्यवसायाचा टप्पा पार केला असून, करहर शाखेच्या माध्यमातून परिसरातील नागरिक, व्यापारी, उद्योजक आणि ठेवीदारांना अधिक सक्षम आर्थिक सेवा देण्याचा प्रयत्न असल्याचे सांगण्यात आले.

या उद्घाटन सोहळ्यास संचालिका सौ. सोनाली रांजणे, अध्यक्ष मा. श्री. सुशील गोळे, CEO मा. श्री. भीमराव मानकुंमरे, जावळी पंचायत समितीचे उपसभापती मा. श्री. गोरख बाबा महाडीक, मा. श्री. नितीन गावडे, मा. श्री. निकम, सातारा जिल्हा प्रमुख वास्तुशास्त्र तज्ज्ञ तसेच हाडवैद्य दिलीप गोळे (स्वामी) यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

यावेळी ज्येष्ठ ठेवीदार मारुती रांजणे (मामा), शिवाजी रांजणे, माजी SDC व्यवस्थापक किरण जांभळे, उद्योजक शामराव भिलारे, अशोक पवार, संतोष गावडे, राहुल कदम, सुशील गोळे, समीर ढमाळ, तसेच एकनाथ मानकुमरे, सर्जेराव गावडे, डॉ. सतीश रहाटे, डॉ. प्रदीप यादव, रविकांत बेलोशे, वसंत बेलोशे, के. डी. पवार, उत्तम रांजणे, ज्ञानेश्वर रांजणे, सुधाकर देवघरे, चंद्रकांत बेलोशे सर, सुनीलदत्ता यादव सर, विजय बेलोशे, ज्ञानेश्वर बेलोशे, दीपक बेलोशे, पांडुरंग शिंदे, आनंदराव जगताप, संजय गोळे, विक्रम चोरट, सागर बेलोशे आदी उपस्थित होते.


करहर बाजारपेठेतील पदाधिकारी, व्यापारी व उद्योजक, करहर पंचक्रोशीतील हायस्कूलमधील शिक्षकवर्ग तसेच परिसरातील नागरिकांनीही कार्यक्रमाला मोठी उपस्थिती लावली.

Post a Comment

0 Comments