दारूच्या नशेत कृष्णा नदीत
वाहणाऱ्या व्यक्तीचे पोलिसांनी
व ग्रामस्थांनी वाचवले प्राण
संतोष शिराळे, सातारा :
सातारा तालुक्यातील मर्ढे येथे पुराच्या पाण्यात वाहून जाणाऱ्या एका व्यक्तीचे पोलीस, होमगार्ड आणि ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे प्राण वाचले. या धाडसी बचावकार्याबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
मर्ढे–आनेवाडी जोडणाऱ्या पुलावरून कृष्णा नदीचे पाणी ओसंडून वाहत असताना, शिवाजी शिंगटे (रा. मर्ढे) हे दारूच्या नशेत स्मशानभूमीच्या बाजूने जात असताना पाय घसरून नदीच्या वेगवान प्रवाहात पडले.
घटनेची माहिती मिळताच बंदोबस्तावर तैनात असलेले पोलीस हवालदार आशिष कुमठेकर, पोलीस शिपाई प्रसाद शिंदे, होमगार्ड करण मोरे व किरण खवले यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी सरपंच सविता शिंगटे, उपसरपंच विक्रम शिंगटे, पोलीस पाटील महेश रोकडे आणि स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने जीवाची पर्वा न करता बचावकार्य राबवून संबंधित व्यक्तीला सुखरूप बाहेर काढण्यात आले.
घटनेनंतर सातारा तालुका पोलिसांनी पुलाच्या परिसरात अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला असून बॅरिकेटिंग व इशारा फलक लावण्यात आले आहेत. नागरिकांनी पुराच्या पाण्यात उतरू नये आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
"पूरपरिस्थिती पाहता पोलीस व होमगार्डना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. मर्ढे येथील घटनेत कर्मचाऱ्यांनी व ग्रामस्थांनी दाखवलेले धाडस कौतुकास्पद असून नागरिकांनीही सुरक्षेचे नियम पाळावेत."
निलेश तांबे,
पोलीस निरीक्षक, सातारा तालुका पोलीस ठाणे

0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!