उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती अचानक खालावली; ठाण्यातील रुग्णालयात उपचार सुरू

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची

प्रकृती अचानक खालावली

ठाण्यातील ज्युपीटर रुग्णालयात उपचार सुरू

मुंबई, प्रतिनिधी : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती अचानक खालावल्याने त्यांना ठाण्यातील ज्युपीटर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे.


गेल्या काही दिवसांपासून पावसाळी अधिवेशन, विविध राजकीय बैठका आणि 'ऑपरेशन टायगर' मोहिमेमुळे त्यांची मोठी धावपळ सुरू होती. सततच्या दगदगीमुळे आणि ताप अंगावर काढल्याने त्यांची प्रकृती बिघडल्याचे सांगितले जात आहे.

काल रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या शिवसेनेच्या पक्षप्रवेश कार्यक्रमाला ते उपस्थित राहू शकले नाहीत. शिवसेना नेत्या शुभांगी पाटील यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडला.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीवर डॉक्टरांचे बारकाईने लक्ष असून आवश्यक उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीबाबत पुढील वैद्यकीय अहवालाची प्रतीक्षा आहे.

Post a Comment

0 Comments