बारामतीत अजितदादा पवार यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

बारामतीत भावपूर्ण वातावरणात

अजितदादा पवार यांच्या 

पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

बारामती | प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे बारामती येथे गुरुवारी भावपूर्ण वातावरणात अनावरण करण्यात आले.

यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार आणि जय अजित पवार यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. कार्यक्रमापूर्वी उपस्थित मान्यवरांनी पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

कार्यक्रमास विविध क्षेत्रांतील मान्यवर, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी अजितदादा पवार यांच्या जनसेवा, विकासाभिमुख नेतृत्व आणि राज्याच्या प्रगतीसाठी दिलेल्या योगदानाचा गौरव केला. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन समाजहिताचे कार्य पुढे नेण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.



Post a Comment

0 Comments