इको-सेन्सिटिव्ह
महाबळेश्वरमध्ये
वृक्षांची कत्तल
वृक्षतोडीचा मोठा प्रकार उघडकीस
'द क्लब'च्या पदाधिकाऱ्यांसह तिघांवर गुन्हा
महाबळेश्वर : पर्यावरणदृष्ट्या अतिसंवेदनशील मानल्या जाणाऱ्या महाबळेश्वरमध्ये विनापरवाना वृक्षतोड केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून, या प्रकरणी 'द क्लब, महाबळेश्वर'च्या अध्यक्षा व सचिवांसह तिघांविरोधात महाबळेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महाबळेश्वर येथील सिटी सर्व्हे क्रमांक ११७ व ११८ मधील 'द क्लब'च्या हद्दीत २० मे २०२५ ते ११ जून २०२६ या कालावधीत कोणतीही आवश्यक परवानगी न घेता मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करण्यात आल्याचे निदर्शनास आले. याबाबत महाबळेश्वर नगरपालिकेने केलेल्या पाहणीत वृक्षतोड झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पालिकेचे कर्मचारी कल्याण बाजीराव हिवरे यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.
या प्रकरणी मनीषा गोखले शाह (वय ६५, अध्यक्षा, द क्लब), निवृत्त लेफ्टनंट कर्नल गौतम नंदी (वय ६२, सचिव, द क्लब) तसेच मेढा (ता. जावली) येथील द्वारकाधीश कन्स्ट्रक्शन वर्कचे सुहास पार्टे (वय ४०) यांच्याविरोधात महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे जतन व संवर्धन अधिनियम, १९७५ मधील कलम २१(१)(२) व ११ तसेच भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ मधील कलम ३२४(४) आणि ३(५) अन्वये गुन्हा क्रमांक ५३/२०२६ दाखल करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक बी. पी. सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार अवघडे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!