दर्जेदार शिक्षण आणि ग्रामीण
पर्यटनातून रोजगार निर्मितीला
चालना देणार : मानकुमरे
१३८ वर्षांची परंपरा लाभलेल्या रांजणी जिल्हा परिषद शाळेच्या नव्या वास्तूचे लोकार्पण

१८८८ मध्ये स्थापन झालेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रांजणीने यंदा तब्बल १३८ वर्षांचा गौरवशाली प्रवास पूर्ण केला आहे. रांजणी, घोटेघर आणि वहागाव परिसरातील हजारो विद्यार्थ्यांना ज्ञानाचे संस्कार देत अनेक गुणवंत नागरिक घडविण्याचे कार्य या शाळेने केले आहे. या वैभवशाली परंपरेला साजेसा असा ऐतिहासिक क्षण शनिवारी अनुभवायला मिळाला. जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श शाळा रांजणीच्या नव्याने उभारण्यात आलेल्या भव्य आणि सुसज्ज इमारतीचे लोकार्पण उत्साहपूर्ण वातावरणात झाले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य वसंतरावभाऊ मानकुमरे होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्या जयश्रीताई गिरी, माजी शिक्षण सभापती अमितदादा कदम, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक राजेंद्रशेठ राजपुरे, पंचायत समिती उपसभापती गोरखबाबा महाडिक, पंचायत समिती सदस्या शिल्पाताई शिंदे, आरुशिला पवार, गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच आजी-माजी शिक्षकवृंदांनीही या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्याचा मान मिळविला.

आपल्या भाषणात वसंतराव मानकुमरे यांनी ग्रामीण भागाच्या विकासाचाही आढावा घेतला. प्रत्येक गाव डोंगरमाथ्यापासून पायथ्यापर्यंत जोडण्यासाठी रस्ते विकासाला प्राधान्य देण्यात आले असून अनेक रस्त्यांच्या कामांचा आराखडा तयार करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या कामांसाठी लवकरच निधी उपलब्ध होऊन दळणवळणाचा मार्ग अधिक सुकर होणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

महाबळेश्वर-पाचगणीसारखे निसर्गरम्य पर्यटन क्षेत्र लाभलेल्या या भागात महू-हातगेघर धरण परिसरातही पर्यटनाच्या नव्या संधी निर्माण होत असल्याचे सांगत त्यांनी हॉटेल्स, रेस्ट हाऊस, बोटिंग यांसारख्या प्रकल्पांच्या माध्यमातून स्थानिक युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे स्पष्ट केले.
जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक राजेंद्रशेठ राजपुरे यांनी रांजणी शाळेच्या समृद्ध परंपरेचा गौरव करत आजी-माजी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. शाळेचा शैक्षणिक दर्जा अधिक उंचावण्यासाठी शिक्षकांसोबतच पालकांनीही विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

माजी शिक्षण सभापती अमितदादा कदम यांनी महू धरण परिसरातील पर्यटन विकास आणि आधुनिक शेतीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील तरुणांना गावातच रोजगाराच्या संधी निर्माण करून देण्याची आवश्यकता अधोरेखित केली. रोजगारासाठी शहरांकडे जाणाऱ्या युवकांना आपल्या गावातच उद्योग आणि व्यवसायाच्या माध्यमातून स्थिर करण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न व्हावेत, असे आवाहन त्यांनी केले.
माजी विद्यार्थी अरुण रांजणे यांनी शाळेबद्दल अभिमान व्यक्त करत, "ही आपली शाळा असून तिच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही ग्रामस्थ कायम कार्यरत राहू. शाळेच्या भौतिक सुविधांसाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्यात येतील," अशी ग्वाही दिली.

प्रास्ताविक संतोष रांजणे यांनी केले. त्यांनी शाळेच्या १३८ वर्षांच्या वैभवशाली इतिहासाचा आढावा घेत नव्या इमारतीमुळे विद्यार्थ्यांना आधुनिक व दर्जेदार शिक्षणाची सुविधा उपलब्ध होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. शाळेचे मुख्याध्यापक धुमाळ सर यांनी उपस्थित मान्यवर, शिक्षक, ग्रामस्थ आणि सर्व सहकाऱ्यांचे आभार मानले.

यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा, आजी-माजी विद्यार्थ्यांचा यावेळी शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी रांजणी, घोटेघर व वहागाव येथील सरपंच, ग्रामस्थ, महिला, युवक-युवती, विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!