विकासाच्या मुद्द्यावर अभयसिंह जगताप यांचा विजयाचा विश्वास

विकासाच्या मुद्द्यावर

अभयसिंह जगताप यांचा

विजयाचा विश्वास

महाविकास आघाडीच्या प्रचाराला वेग

सांगली–सातारा विधान परिषद निवडणूक

सातारा : सांगली–सातारा स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणूक २०२६ मध्ये महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अभयसिंह जगताप यांनी विकास, प्रगती आणि पुरोगामी विचारांच्या बळावर निवडणूक लढविण्याचा निर्धार व्यक्त केला असून महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांनी एकजुटीने पाठीशी उभे राहत प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले आहे.

उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी पक्षाचे राष्ट्रीय नेते शरदचंद्र पवार, ज्येष्ठ नेते जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्यासह महाविकास आघाडीतील सर्व वरिष्ठ नेत्यांचे आभार मानले. जनतेने आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रतिनिधींनी दाखविलेल्या विश्वासाच्या बळावर आपण सातत्याने लोकांच्या प्रश्नांसाठी काम करत आलो असून ही निवडणूक केवळ एका उमेदवाराची नसून विकास, लोकहित आणि पुरोगामी विचारांच्या विजयाची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अभयसिंह जगताप यांनी माजी मंत्री तथा आमदार विश्वजीत कदम यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी आगामी निवडणुकीसंदर्भात सविस्तर चर्चा झाली असून महाविकास आघाडीच्या विजयासाठी आवश्यक असलेल्या विविध विषयांवर सकारात्मक विचारविनिमय करण्यात आला.

लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या एकजुटीच्या बळावर ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने जिंकण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांमध्ये समन्वय आणि उत्साहाचे वातावरण असून विकासाभिमुख राजकारणाच्या माध्यमातून मतदारांचा विश्वास संपादन करण्यावर भर दिला जात असल्याचेही यावेळी अधोरेखित करण्यात आले.

भविष्यातही जनतेच्या अपेक्षांना न्याय देत लोकहिताच्या प्रश्नांसाठी अधिक जोमाने काम करण्याचा निर्धार व्यक्त करत अभयसिंह जगताप यांनी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सदस्यांना विजयासाठी एकदिलाने काम करण्याचे आवाहन केले आहे.

Post a Comment

0 Comments