कृषी विभागामार्फत सासकल येथे
हुमणी कीड भुंगेरे नियंत्रण मोहीम
सासकल येथे कृषी विभागाचा हुमणी कीड नियंत्रण उपक्रम
शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात लाईट ट्रॅपचा वापर
फलटण : खरीप हंगाम २०२६-२७ च्या पार्श्वभूमीवर कृषी विभागामार्फत विविध जनजागृती व कीड नियंत्रण मोहिमा राबविण्यात येत आहेत. तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय गायकवाड, मंडळ कृषी अधिकारी अशोक जगदाळे व उपकृषी अधिकारी अजित सोनलकर यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण तालुक्यातील विविध गावांमध्ये शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जात आहे.
याच अनुषंगाने सासकल (ता. फलटण, जि. सातारा) येथे कृषी विभागामार्फत हुमणी कीड भुंगेरे नियंत्रणासाठी प्रकाश (लाईट) सापळा उपक्रम राबविण्यात आला. हा उपक्रम शेतकरी शिवाजी बुवासो झांजुर्णे यांच्या शेतावर प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे घेण्यात आला.
हुमणी किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृषी अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन करत असून, जून-जुलै महिन्यात पाऊस सुरू झाल्यानंतर संध्याकाळी ७ ते ९ या वेळेत बाभूळ, कडुनिंब व बोराच्या झाडांवर जमा होणारे प्रौढ भुंगेरे झाडांच्या फांद्या हलवून खाली पाडावेत आणि रॉकेल मिश्रित पाण्यात गोळा करून नष्ट करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच भुंगेरे आकर्षित करण्यासाठी शेताजवळ प्रकाश सापळे (लाईट ट्रॅप) बसविण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.
हुमणी किडीच्या भुंगेरांचे वेळेत नियंत्रण केल्यास त्यांची अंडी घालण्याची प्रक्रिया रोखली जाऊन अळ्यांची निर्मिती कमी होते. परिणामी पिकांचे होणारे नुकसान टाळता येऊन उत्पादनवाढीस मदत होते, असे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.
सासकल गावातील अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात प्रकाश सापळे उभारले असून, हुमणी कीड नियंत्रणासाठी शेतकरी सकारात्मक प्रतिसाद देत असल्याची माहिती कृषि सेवारत्न तथा सहायक कृषी अधिकारी सचिन जाधव यांनी दिली.


0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!