जलमंदिर पॅलेस येथे
अभिनेते सयाजी शिंदे
यांची सदिच्छा भेट
पर्यावरण संवर्धनाच्या उपक्रमांवर खा. उदयनराजेंशी सविस्तर चर्चा
सातारा | प्रतिनिधी
सातारा जिल्ह्याचे सुपुत्र, ज्येष्ठ अभिनेते आणि सह्याद्री देवराई सामाजिक संस्थेचे संस्थापक सयाजी शिंदे यांनी आज जलमंदिर पॅलेस येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी पर्यावरण संरक्षण, वृक्ष संवर्धन आणि सामाजिक उपक्रमांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
सह्याद्री देवराई सामाजिक संस्थेमार्फत राज्यभर राबविण्यात येणारे वृक्ष संगोपन, वृक्ष संवर्धन आणि पर्यावरण संरक्षणाचे विविध उपक्रम यावेळी चर्चेचा केंद्रबिंदू ठरले. वाढती पर्यावरणीय आव्हाने आणि बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर केवळ वृक्षारोपण न करता वृक्षांचे संगोपन आणि संवर्धन करणे ही काळाची गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
समाजातील प्रत्येक घटकाने पर्यावरण रक्षणासाठी सक्रिय सहभाग नोंदवून भावी पिढ्यांसाठी हरित वारसा जपण्याची आवश्यकता असल्याबाबतही यावेळी विचारांची देवाणघेवाण झाली.
आपल्या उत्कृष्ट अभिनयाच्या बळावर देश-विदेशात विशेष नावलौकिक मिळविणारे अभिनेते सयाजी शिंदे यांनी सामाजिक बांधिलकी जपत पर्यावरण संवर्धनासाठी हाती घेतलेले कार्य अत्यंत प्रेरणादायी असून, त्यांच्या निसर्गप्रेमाचा आणि समाजाप्रती असलेल्या संवेदनशीलतेचा यावेळी गौरव करण्यात आला.
पर्यावरण संवर्धनाच्या चळवळीला अधिक व्यापक स्वरूप मिळावे आणि सह्याद्री देवराई सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सुरू असलेले उपक्रम अधिक जोमाने पुढे जावेत, अशा शुभेच्छाही यावेळी व्यक्त करण्यात आल्या.




0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!