ब्रह्मलीन आचार्य नित्यानंद महाराज आर्थिक विकास महामंडळावर अंकुश लोहार यांची संचालकपदी नियुक्ती करावी

ब्रह्मलीन आचार्य नित्यानंद

महाराज आर्थिक विकास

महामंडळावर 

अंकुश लोहार यांची 

संचालकपदी नियुक्ती करावी

सातारा जिल्ह्यातील लोहार सुतार समाज बांधवांची मागणी

कराड : लोहार-सुतार समाजाचे नेते तथा भारतीय जनता पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते अंकुश लोहार यांची ब्रह्मलीन आचार्य नित्यानंद महाराज आर्थिक विकास महामंडळावर संचालकपदी नियुक्ती करावी, अशी मागणी समाजबांधवांकडून जोर धरू लागली आहे.

अंकुश लोहार यांनी गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक कामात सक्रिय सहभाग नोंदविला असून, लोहार-सुतार समाजाच्या विविध प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा केला आहे. समाजातील शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी त्यांनी विविध उपक्रम राबवून समाजबांधवांमध्ये विश्वासाचे स्थान निर्माण केले आहे.

ब्रह्मलीन आचार्य नित्यानंद महाराज आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून पारंपरिक व्यवसाय करणाऱ्या कारागीर, लोहार, सुतार आणि इतर घटकांच्या आर्थिक उन्नतीसाठी विविध योजना राबविल्या जातात. या महामंडळावर समाजातील जाणकार आणि तळागाळातील कार्यकर्त्यांना संधी मिळणे आवश्यक असल्याचे मत समाजातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी व्यक्त केले आहे.

अंकुश लोहार यांना समाजकारणाचा प्रदीर्घ अनुभव असून, समाजातील सर्व घटकांना एकत्रित घेऊन काम करण्याची त्यांची भूमिका राहिली आहे. त्यामुळे त्यांची संचालकपदी नियुक्ती झाल्यास लोहार-सुतार समाजासह पारंपरिक व्यवसाय करणाऱ्या कारागिरांच्या प्रश्नांना न्याय मिळण्यास मदत होईल, असा विश्वास समाजबांधवांनी व्यक्त केला आहे. यासंदर्भात राज्य शासनाने आणि संबंधित विभागाने सकारात्मक विचार करून अंकुश लोहार यांना ब्रह्मलीन आचार्य नित्यानंद महाराज आर्थिक विकास महामंडळावर संचालकपदाची जबाबदारी द्यावी, अशी मागणी लोहार-सुतार समाजातून करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments