नेर धरणात बुडालेल्या
व्यक्तीचा सात तासांच्या
प्रयत्नांनंतर मृतदेह बाहेर
शिवेंद्रसिंहराजे रेस्क्यू टीमची यशस्वी मोहीम
सातारा : नेर धरणात बुडालेल्या एका व्यक्तीच्या शोधासाठी शनिवारी छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले रेस्क्यू टीमला कॉल प्राप्त झाला होता. त्यानुसार रविवारी पहाटे साडेसहा वाजता टीम घटनास्थळी रवाना झाली. सकाळी सात वाजल्यापासून सुरू करण्यात आलेल्या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये तब्बल सात तास अथक परिश्रम घेतल्यानंतर दुपारी एक वाजण्याच्या सुमारास बुडालेल्या व्यक्तीचा मृतदेह शोधून बाहेर काढण्यात टीमला यश आले.
धरणातील प्रतिकूल परिस्थिती आणि आव्हानात्मक वातावरणातही रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी धैर्याने आणि संयमाने शोधमोहीम सुरू ठेवली. अखेर सात तासांच्या सततच्या प्रयत्नांनंतर मृतदेहाचा शोध लागल्याने नातेवाईकांना मोठा दिलासा मिळाला.
या मोहिमेत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले रेस्क्यू टीमचे चंद्रसेन पवार, अथर्व बिडकर, ऋषिकेश रंकाळे, सिद्धार्थ गायकवाड, अनुराग सुतार, विशाल साळुंखे, रुद्र महाडीक, देवा गुरव, आदित्य पवार आणि गणेश निपाणे यांनी सात तास अहोरात्र मेहनत घेत महत्त्वाची भूमिका बजावली. रेस्क्यू टीमच्या या कार्याचे परिसरातून कौतुक होत असून, संकटसमयी जीवाची पर्वा न करता मदतीसाठी धावून जाणाऱ्या या जवानांना नागरिकांकडून सलाम करण्यात येत आहे.

0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!