कोळे येथील निवृत्त शिक्षक
शिवाजी लोहार (बापू) यांचे निधन
कराड प्रतिनिधी : मौजे कोळे (ता. कराड, जि. सातारा) येथील सुपुत्र, निवृत्त माध्यमिक शिक्षक तथा लोहार-सुतार समाजातील ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व कै. शिवाजी शंकर लोहार (बापू) यांचे रविवार, दि. १४ जून २०२६ रोजी सकाळी अल्पशा आजाराने राहत्या घरी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने कोळे गावासह संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे.
शिक्षक म्हणून अनेक विद्यार्थ्यांना घडविणारे बापू हे आदर्श, श्रद्धाळू, प्रेमळ, शांत, संयमी, दानशूर, कुटुंबवत्सल आणि समाजप्रिय व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित होते. प्रभू श्रीरामाचे निस्सीम भक्त असलेल्या बापूंनी आपले संपूर्ण आयुष्य अध्यात्मिक विचारांच्या वाटेवर व्यतीत केले. अखेरच्या श्वासापर्यंत प्रभू श्रीरामाचे स्मरण, चिंतन आणि नामजप त्यांनी अखंडपणे केला. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच नातेवाईक, मित्रपरिवार, माजी विद्यार्थी, ग्रामस्थ तसेच समाजबांधवांकडून हळहळ व्यक्त करण्यात आली. त्यांच्यावर आज दुपारी २ वाजता कोळे गावातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
पंचवदन विश्वकर्मा सामाजिक संस्था, उंब्रज तसेच संलग्न उपशाखा कराड, पाटण व सातारा आणि कोळे गावातील तमाम लोहार-सुतार समाज बांधवांच्या वतीने कै. शिवाजी शंकर लोहार (बापू) यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती व सद्गती लाभो तसेच त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याचे बळ प्राप्त होवो, हीच प्रभू श्रीराम चरणी प्रार्थना व्यक्त करण्यात आली.
कै. शिवाजी शंकर लोहार (बापू) यांना भावपूर्ण श्रद्धांजली! 💐🙏

0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!