मरळी येथील रहिवासी प्रकाश कृष्णाजी सुतार यांचे निधन

मरळी येथील रहिवासी 

प्रकाश सुतार यांचे निधन

पाटण प्रतिनिधी : मरळी (ता. पाटण) येथील रहिवासी तथा पुणे येथे उद्योग व्यवसाय उभारून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे प्रकाश कृष्णाजी सुतार यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने मरळी परिसरासह सुतार-लोहार समाजावर शोककळा पसरली आहे.

प्रकाश सुतार हे जुन्या पिढीतील नामवंत कीर्तनकार ह.भ.प. कृष्णाजी सुतार यांचे जेष्ठ सुपुत्र होते. आपल्या कर्तृत्वाच्या बळावर त्यांनी पुणे येथे उद्योग सुरू करून यशस्वी वाटचाल केली. मरळी येथील सुतार-लोहार समाजातील पहिले चालक (ड्रायव्हर) म्हणून त्यांचा विशेष लौकिक होता. त्यांच्या मनमिळावू स्वभावामुळे आणि समाजाशी असलेल्या घट्ट नात्यामुळे त्यांना सर्व स्तरात मानाचे होते.

त्यांच्या निधनाची वार्ता समजताच नातेवाईक, मित्रपरिवार आणि ग्रामस्थांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. प्रकाश कृष्णाजी सुतार यांच्या निधनाने एक कर्तृत्ववान, समाजाभिमुख आणि जेष्ठ व्यक्तिमत्त्व हरपले असून, त्यांच्या आठवणी कायम सर्वांच्या स्मरणात राहतील, अशा भावना व्यक्त होत आहेत.

Post a Comment

0 Comments