गांजे येथील ज्येष्ठ नागरिक
पांडुरंग सुतार यांचे निधन
सातारा : जावळी तालुक्यातील गांजे येथील रहिवासी तसेच लोहार–सुतार समाजाचे ज्येष्ठ नागरिक श्री. पांडुरंग सखाराम सुतार (आप्पा) यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. निधनसमयी त्यांचे वय ७० वर्षे होते.
त्यांच्या पश्चात मुलगा, मुली, नातवंडे तसेच आप्तस्वकीय असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने गांजे गावासह लोहार–सुतार समाजात शोककळा पसरली असून, विविध स्तरांतून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.
त्यांच्यावर गांजे येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. सावडणे विधी रविवार, दि. २८ जून रोजी सकाळी ९.०० वाजता होणार आहेत.

0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!