कोयना धरण परिसरात पावसाची हजेरी, नवजाला 63 मिमी
पाणीसाठ्यात मात्र घट कायम
उपयुक्त साठा फक्त 10.08 टीएमसी
सातारा, प्रतिनिधी - संतोष शिराळे : कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली असली तरी धरणातील पाणीसाठ्यातील घट अद्याप कायम आहे. रविवारी सकाळी ८ वाजता प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार, कोयना धरणात 15.20 टीएमसी (14.44 टक्के) इतका एकूण पाणीसाठा असून उपयुक्त (लाईव्ह) साठा 10.08 टीएमसी (10.06 टक्के) इतका नोंदविण्यात आला आहे.
धरणाची पाणीपातळी 2042 फूट 11 इंच (622.681 मीटर) इतकी नोंदली गेली आहे. मागील काही दिवसांपासून वीजनिर्मितीसाठी सुरू असलेल्या विसर्गामुळे आणि पाण्याची आवक नसल्याने साठ्यात घट होत आहे. गेल्या २४ तासांत कोयना धरण परिसरात 8 मिमी, नवजा येथे 63 मिमी, तर महाबळेश्वर येथे 4 मिमी पावसाची नोंद झाली आहे. विशेषतः नवजा परिसरात समाधानकारक पाऊस झाला असला तरी धरणात अद्याप कोणतीही नवीन पाण्याची आवक झालेली नाही.
सध्या कोयना जलविद्युत प्रकल्पातून 1,050 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू असून नदीपात्रात कोणताही अतिरिक्त विसर्ग करण्यात आलेला नाही. त्यामुळे धरणातून होणारा एकूण विसर्ग 1,050 क्युसेक्स इतकाच आहे.मान्सूनच्या आगमनानंतर पावसाचा जोर वाढल्यास कोयना धरणातील पाणीसाठ्यात वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सध्या मात्र जिल्ह्यातील पाणीपुरवठा आणि सिंचन व्यवस्थेच्या दृष्टीने धरणातील साठ्यावर प्रशासनाचे बारकाईने लक्ष आहे.

0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!