धैर्यशीलदादा कदम यांनी उमेदवारी अर्ज दाखल; सातारा-सांगली विधान परिषद निवडणूक

 


धैर्यशीलदादा कदम यांचा

उमेदवारी अर्ज दाखल

सातारा-सांगली विधान परिषद निवडणूक

सांगली : सातारा-सांगली स्थानिक प्राधिकरण मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार धैर्यशीलदादा कदम यांनी आज सांगली जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

यावेळी प्रमुख उपस्थितीत खा. उदयनराजे भोसले, ना. चंद्रकांतदादा पाटील, ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले तसेच ना. जयकुमार गोरे उपस्थित होते. महायुतीच्या नेत्यांच्या उपस्थितीमुळे अर्ज दाखल कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.

उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सातारा व सांगली जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टी महायुतीचे लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषदांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. याशिवाय दोन्ही जिल्ह्यांतील नगरपालिका व नगरपंचायतींमधील भाजप महायुतीचे नगरसेवक तसेच पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीही मोठ्या संख्येने हजेरी लावली.

महायुतीच्या समर्थकांच्या उत्स्फूर्त उपस्थितीत आणि जल्लोषपूर्ण वातावरणात धैर्यशीलदादा कदम यांनी उमेदवारी अर्ज दाखल करत निवडणुकीच्या प्रचाराचा श्रीगणेशा केला. यावेळी उपस्थित नेत्यांनी विजयाचा विश्वास व्यक्त करत महायुतीच्या एकजुटीचे दर्शन घडविले.

सातारा-सांगली स्थानिक प्राधिकरण मतदारसंघातील ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात असून, महायुतीने धैर्यशीलदादा कदम यांच्या उमेदवारीच्या माध्यमातून विजयाचा निर्धार व्यक्त केला आहे.

Post a Comment

0 Comments